आता माझी चिता तुज ना
1697.
आता माझी चिता तुज नारायणा | रुक्मिणीरमणा वासुदेवा ॥१॥
द्रौपदी संकटी वस्त्रे पुरविली | धांव त्वा घेतली गजेंद्रासी ॥२॥
उपमन्या आळी तुवा पुरविली | अढळपदो दिल्ही वस्ति ध्रुवा ॥३॥
नामा म्हणे करा करुणा केशवा | तू माझा विसावा पांडुरंगा ॥४॥
