करीन ह्मणसी व्यापार
1672.
करीन ह्मणसी व्यापार ॥ नाम चोखट करी अक्षर ॥१॥
देवा तुझा मी व्यापारी ॥ सेवा करीन नानापरी ॥ २॥
धर्म खर्डा केला जमा ॥ खर्च घातला पूर्वकर्मा ॥ ३ ॥
दोन्ही रोजनामे महिन्याचे ॥ एकादशी द्वादशी पोत्याचे ॥ ४ ॥
सेवेची घडली बा शिल्लक बाकी ॥ भरत हुजत नेटकी ॥ ५ ॥
नाम्याने मोह जवाब दिला ॥ तो वैकुंठी सरता केळा ॥६॥
