देव दगडाचा भक्त हा म
1676.
देव दगडाचा भक्त हा मावेचा | संदेह दोघांचा फिटे कैसा ॥१॥
ऐसे देव तेहि फोडिले तुरकी | घातले उदकी बोभातीना ॥२॥
ऐसिया देवासी वाहिले टिळे डोळे | भक्त बाळे भाळे नागविले ॥३॥
ऐसीहि दैवते नको दावू देवा | नामा म्हणे केशवा विनवितसे ॥४॥
