वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 4. संत नामदेव › 1. संत नामदेव अभंग गाथा › २. संत नामदेव गाथा :- भाग २ › 160. श्री ज्ञानदेव महाराजांच्या भेटी विषयी श्री नामदेवाची आळ

तेज स्पर्श ज्योती कर

🙏 4. संत नामदेव · ABH-081556 · अभंग क्र. १२२१

1221.
तेज स्पर्श ज्योती कर्पुरी निघाली | दोन्ही ती निमाली एकदांची ॥१॥
आघाताने नाद घंटेंतून उठे | शेवटी तो मिटे घंटेमाजी ॥२॥
ब्रह्मी माया स्फुरे चैतन्यप्रकाशे | शेवटी ते वसे ब्रह्मरूपी ॥३॥
पांडुरंग म्हणे ऐक नाम्या ज्ञान | वाटो समाधान तुझ्या जीवा ॥४॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग