नामी धरा दृढ विश्वास
1225.
नामी धरा दृढ विश्वास । घाला कळिकाळावर फास । नाम हाचि निजध्यास । रात्रंदिवस स्मरण ॥१॥
सोपे वर्म कलिमाजीं । नामे तरती जन सहजी । योगयाग तप साधने जी । तया प्राप्ती नामेंची ॥२॥
नाम साधनांचे सार । सोपा मंत्र हरि उच्चार । एका जनार्दनी सार । निवडोनि काढिले ॥३॥
