वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 6. संत निळोबाराय › 1. संत निळोबाराय अभंग गाथा › २. संत निळोबा गाथा भाग २ › २२. हरी हा भक्तांच्या अंकित राहून त्यांचे कार्य किती प्रेमाने व दक्षतेने करतो

भक्त स्तवने जे जे कर

🙏 6. संत निळोबाराय · ABH-089162 · अभंग क्र. १२३७

1237.
भक्त स्तवने जे जे करिती ।
ते जे ऐकोनिया श्रीपती ।
सुखे संतोषोनिया चित्ती ।
दासा देती वरदाने ॥१॥
ध्रुवाने वनी आराधिला ।
तैसाचि उपमन्ये स्तविला ।
एक तो अढळपदी स्थपिला ।
एका दिधला क्षीरसिंधु ॥२॥
प्रल्हादाचे स्तवन गोड ।
त्याचे पुरवी अवघेचि कोड ।
अग्निविषाचे सांकड ।
नेदी पडो शस्त्राचे ॥३॥
द्रौपदीने स्तविताचि तातडी ।
नेसती झाला तिची लुगडी ।
कौरवे लाजविली बापुडी ।
अंगुष्ट तोही दिसो नेदी ॥४॥
गजेंद्राचिया स्तवनासाठी ।
धावे वैकुंठीहुनी उठाउठी ।
निजकरे घालूनिया मिठी ।
सोडवी संकटी स्वामी माझा ॥५॥
रुक्मिणीचे प्राणिग्रहण ।
करी ऐकोनिया तिचे स्तवन ।
पांचाळिये हातीचे भाजीपान ।
करी भोजन स्तवने तिच्या ॥६॥
निळा म्हणे कृपामूर्ति ।
अपार भक्ताचिये स्तुती ।
ऐकोनिया तोषलेती ।
मी ही बाळमती विनवितो ॥७॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग