वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 6. संत निळोबाराय › 1. संत निळोबाराय अभंग गाथा › २. संत निळोबा गाथा भाग २ › २२. हरी हा भक्तांच्या अंकित राहून त्यांचे कार्य किती प्रेमाने व दक्षतेने करतो

बहुता देऊनी अभयदाने

🙏 6. संत निळोबाराय · ABH-089177 · अभंग क्र. १२३१

1231.
बहुता देऊनी अभयदाने ।
गौरविले आपल्या मने ।
घालूनी शांतीची आसने ।
ब्रम्हसाम्राज्यी बैसविले ॥१॥
ध्यानतन्मयाची छत्रे ।
माथा झळकती विचित्रे ।
अगाध कीर्तीची दिव्य वस्त्रे ।
प्रल्हादादिका समर्पिली ॥२॥
नारदा निर्लोभ वागेश्वरी ।
नामस्मरणाची वैखरी ।
देउनी दिव्य अळंकारी ।
दैवांदैत्यामाजी मिरविला ॥३॥
व्यासा वाल्मिका अगाध मती ।
देउनी वंदय केले त्रिजगती ।
जनक पृथु हे भूपती ।
आपुले पंगती बैसविले ॥४॥
अर्जुनादिकासी आपुले ।
ऐश्वर्य देउनी थोराविले ।
सांख्य सिध्दात उपदेशिले ।
रणी वागविले रथवारु ॥५॥
उध्दवा मैत्रेया कृपा वोगरिली ।
निजात्मज्ञाने तृप्ति केली ।
भक्त कृपाळु माउली ।
गौरविली निज बाळके ॥६॥
निळा नेणते निपटणे ।
काहीचि खाऊ जेऊ नेणे ।
वाढविले ते स्तनपाने ।
नामचिंतने आपुलिया ॥७॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग