भक्ताघरीचे करीन काम
1234.
भक्ताघरीचे करीन काम ।
त्यांचेच नाम वागवीन ॥१॥
भक्तरुपे विराजलो ।
स्थिरावलो ह्रदयी त्या ॥२॥
भक्तसुखे सुखावत ।
त्यांच्याचि क्रीडत देहसंगे ॥३॥
निळा म्हणे ऐसा देव ।
दाखवी प्रभाव आपुला ॥४॥
1234.
भक्ताघरीचे करीन काम ।
त्यांचेच नाम वागवीन ॥१॥
भक्तरुपे विराजलो ।
स्थिरावलो ह्रदयी त्या ॥२॥
भक्तसुखे सुखावत ।
त्यांच्याचि क्रीडत देहसंगे ॥३॥
निळा म्हणे ऐसा देव ।
दाखवी प्रभाव आपुला ॥४॥