आपुलें कल्याण इच्छिल
1234.
आपुलें कल्याण इच्छिले जयासी । तेणे या नामासी विसंबू नये ॥१॥
करील परिपुर्ण मनींचे हेत । ठेविलिया चित्त नामापाशी ॥२॥
भुक्ति आणि मुक्ति वोळगंती सिद्धि । होईल की वृद्धि आत्मनिष्ठा ॥३॥
एका जनार्दनी जपतां हे नाम । पुरवील काम जो जो हेतु ॥४॥
