देऊनिया आपुले प्रेम
1215.
देऊनिया आपुले प्रेम ।
करी भक्तांचा संभ्रम ॥१॥
आधी निष्काम संपत्ती ।
तया वोपी भुक्ति मुक्ति ॥२॥
निश्चळ शांति क्षमा दया ।
सेवेलागी अर्पी तया ॥३॥
निळा म्हणे महा भाग्य ।
ते त्या समर्पी वैराग्य ॥४॥
1215.
देऊनिया आपुले प्रेम ।
करी भक्तांचा संभ्रम ॥१॥
आधी निष्काम संपत्ती ।
तया वोपी भुक्ति मुक्ति ॥२॥
निश्चळ शांति क्षमा दया ।
सेवेलागी अर्पी तया ॥३॥
निळा म्हणे महा भाग्य ।
ते त्या समर्पी वैराग्य ॥४॥