देवाधिदेव मुगुटमणी ।
1216.
देवाधिदेव मुगुटमणी ।
करी टेहणी दासाघरी ॥१॥
शीण त्या होऊ नेदी भाग ।
वोडवी अंग त्या अंगी ॥२॥
शुभाशुभ त्याची कर्मे ।
वारुनी दुर्गमे सुखी करी ॥३॥
निळा म्हणे आपणासरी ।
करुनिया करी बहुमान ॥४॥
1216.
देवाधिदेव मुगुटमणी ।
करी टेहणी दासाघरी ॥१॥
शीण त्या होऊ नेदी भाग ।
वोडवी अंग त्या अंगी ॥२॥
शुभाशुभ त्याची कर्मे ।
वारुनी दुर्गमे सुखी करी ॥३॥
निळा म्हणे आपणासरी ।
करुनिया करी बहुमान ॥४॥