वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 4. संत नामदेव › 1. संत नामदेव अभंग गाथा › ३. संत नामदेव गाथा :- भाग ३ › 165. कुल जन्म वृत्तांत

आम्ही हाटा जाऊ लवकरी

🙏 4. संत नामदेव · ABH-082363 · अभंग क्र. १२३९

1239.
आम्ही हाटा जाऊ लवकरी येऊ | नैवेद्य पाठवू नाम्या हाती ॥१॥
दुसऱ्या दिवशी नैवेद्य धाडिला | दामसेठी गेला त्याच्या मागे ॥२॥
जाऊनिया नामा उभा राहे सन्मुख | म्हणे बिठोबास जेवी बापा ॥३॥
देव म्हणे नाम्या बैसावे दारांत | लवकरी जेवितो पाहे आंता ॥४॥
जेऊनिया देवे हाती दिधली वाटी | तेव्हा दामसेठी काय बोले ॥५॥
बारा वर्ष तुज उपवासी मारिले | आजि जेवविले नामदेवे ॥६॥
देव म्हणे आता ऐका दामसेठी | हे तो गुह्य गोष्टी बोलू नका ॥७॥
आम्ही न बोलता आम्ही न सांगता | कळे अवचिता आपणांसी ॥८॥
करसी चोरी तू गुप्त गोकुळांत | पृथ्वींत मात कोणी नेली ॥९॥
गोकुळींच्या गोष्टी येथे बोलू नये | मौन पंढरिये धरिले आहे ॥१०॥
मौन धरियेले सांगसी आम्हासी | तरी का जेवशी पांडुरंगा ॥११॥
काय तुझे घर पडियेले औस| चोख्यासंगे कैसा जेवलासी ॥१२॥
चोखियाचे अन्न मिष्टांन्न भोजन | मिळाया कारण तेथे नाही ॥१३॥
राम अवतारी वान्नरगणे | लंकेसी झोंबणे सीतेसाठी ॥१४॥
पाला खाऊनिया वाहिले पर्वत | बांधियेला सेतु सिंधूंवरी ॥१५॥
कृष्ण अवतारी गोपाळ साचार | वळू गायी फार देवासवे ॥१६॥
यमुनेचे तीरी खेळू चेंडूफळी | आपण दिधली नाही डावि ॥१७॥
पसरितो पदर धरितो हनुवटी | अन्याय हा पोटी घाली नाम्या ॥१८॥
तेव्हा दामसेठी धरूनि हातासी | म्हणे नामयासी चाल घरा ॥१९॥
धन्य माझे भाग्य धन्य माझा वंश | परब्रह्म वेष प्रगटले ॥२०॥
बौद्ध अवतारी आम्ही जालो संत | वर्णावया मात नामा म्हणे ॥२१॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग