वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 3. संत तुकाराम › 1. संत तुकाराम सार्थ गाथा › २. सार्थ अभंग गाथा › ३. सार्थ अभंग १००१ ते १५००

कोणा चिंता आड । कोणा

🙏 3. संत तुकाराम · ABH-079305 · अभंग क्र. १२१५

1215.
कोणा चिंता आड । कोणा लोकलाज नाड ॥१॥
कैचा राम अमागिया । करी कटकट वाया ॥धृपद॥
स्मरणाचा राग । क्रोधे विटाळले अंग ॥२॥
तुका म्हणे जडा । काय चाले या दगडा ॥३॥

अर्थ :
काही गरिबांना परमार्थ करण्या विषय संसाराची चिंता आड येते, तर काही श्रीमंतांना संसाराची चिंता नसली तरी लोकलज्जा परमार्थ करण्यासाठी नडते. अशा अभागी माणसाच्या तोंडाला रामाचे नाम कधी येणार ? मात्र हे संसारीक वटवट करत असतात. एखाद्याने जर उपदेश केला की तु हरीचे स्मरण कर तर त्याला राग येतो कारण त्यांच्या शरीर क्रोधाने वीटाळलेले असते. तुकाराम महाराज म्हणतात अशा जड दगडा पुढे बोलण्यात कायअर्थ : आहे त्यामुळे अशा मूर्ख माणसांपुढे गप्प राहणे योग्य आहे.

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग