कल्याणींचा सिंपी हरि
1236.
कल्याणींचा सिंपी हरिभक्त गोमा | त्याची कांता उमा नरहरिभजनी ॥१॥
सरिता सुकृताची त्या पोटी उत्पन्न | जाळी संबोधन गोंणाबाई ॥२॥
गोणाई दामासेठी जाले पाणिग्रहण | संसारी असोन नरसी गांवी ॥३॥
गोत्र संज्ञा ऐका पूर्वजांची सहज | गाधिज भारद्वाज दोनी कुळे ॥४॥
आऊबाई कन्या जाली गोणाईसी | पुढे देवा नवसी पुत्रासाठी ॥५॥
नामा म्हणे होते विठोबाचे मनी | तेंचि नित्य जननी नवस करी ॥६॥
