नामदेव म्हणे देवा |
1222.
नामदेव म्हणे देवा | ब्रह्मज्ञान पोटी ठेवा ॥१॥
तुम्ही मायेसंगे गूढ | ज्ञान जाणिवेचे आड ॥२॥
आम्हा नाही याची चाड | वाटे संतभेटी गोड ॥३॥
संतभेटी प्रेम फावे | प्रेमे देवाशी भेटावे ॥४॥
प्रेम आहे पोटभरी | देव त्यासी पोटी धरी ॥५॥
नामदेवा ठायी प्रेम | मार्गी आडविले ब्रह्म ॥६॥
