न विसंबे त्या घटिका
1220.
न विसंबे त्या घटिका पळ ।
त्याचिपाशी सर्वकाळ ॥१॥
उत्तीर्णत्वालागी हरि ।
त्याची परिचर्या करी ॥२॥
न म्हणे दिवस रात्री काही ।
संचरोनि वसे त्याच्या देही ॥३॥
निळा म्हणे भक्तांघरी ।
गुणे नामे रुपे हरी ॥४॥
1220.
न विसंबे त्या घटिका पळ ।
त्याचिपाशी सर्वकाळ ॥१॥
उत्तीर्णत्वालागी हरि ।
त्याची परिचर्या करी ॥२॥
न म्हणे दिवस रात्री काही ।
संचरोनि वसे त्याच्या देही ॥३॥
निळा म्हणे भक्तांघरी ।
गुणे नामे रुपे हरी ॥४॥