धन्य पुण्यभूमि आळंदी
1231.
धन्य पुण्यभूमि आळंदी हे गांव | देवताचे नांव सिद्धेश्वर ॥१॥
चौऱ्यांशी सिद्धींचा सिद्धभेटी मेळा | तो सुखसोहळा काय सांगू ॥२॥
विमानांची दाटी पाहती सुरवर | वर्षताती भार सुमनांचे ॥३॥
नामा म्हणे देवा चला तया ठाया | विश्रांति घ्यावया कल्पवरी ॥४॥
