नामापाशीं तिष्ठे देव
1231.
नामापाशीं तिष्ठे देव । नामापाशीं वसे भाव । नामापाशी मुक्ति गौरव । अहर्निशी वसतसे ॥१॥
नामापाशी ऋद्धिसिद्ध । नामापाशीं ते समाधी । नामे तुटती उपाधी । जन्मोजन्मीच्या ॥२॥
नामापाशीं भुक्ति मुक्ति । नामापाशी ते विरक्ती । नामे पातकें नासती । बहु जन्माचीं ॥३॥
एका जनार्दनी नाम । गाता निरसे भवभ्रम । साधन उत्तम । कलियुगामाझारीं ॥४॥
