निज भक्ताची आवडी ।
1223.
निज भक्ताची आवडी ।
सांभाळी त्या घडी घडी ॥१॥
राखोनिया भूक तहान ।
करी त्याचा बहुमान ॥२॥
वस्त्रे भूषणे पूरवी ।
चिंता त्याची वाहे जिवी ॥३॥
निळा म्हणे त्याचे उणे ।
नेदी पडो कवण्या गुणे ॥४॥
1223.
निज भक्ताची आवडी ।
सांभाळी त्या घडी घडी ॥१॥
राखोनिया भूक तहान ।
करी त्याचा बहुमान ॥२॥
वस्त्रे भूषणे पूरवी ।
चिंता त्याची वाहे जिवी ॥३॥
निळा म्हणे त्याचे उणे ।
नेदी पडो कवण्या गुणे ॥४॥