राजाला आळस संन्याशाल
1233.
राजाला आळस संन्याशाला सायास । विधवेसी विलास विटंबना ॥१॥
व्याघ्रासी शांतता गाईसी उग्रता । वेश्येसी हरिकथा । विटंबना ॥२॥
दानेंविण पाणी । घ्राणेविन घाणी । नामेंविण वाणी विटंबना ॥३॥
एका जनार्दनी भावभक्तीविणा । पुण्य केले नाना विटंबना ॥४॥
