देव कळवळले चित्ती |
1224.
देव कळवळले चित्ती | त्यासी मायेची संमती ॥१॥
मायबापांचा त्या लळा | नामा घेईना का आळा ॥२॥
बाप जगताचा स्वामी | आई प्रत्यक्ष लक्षुमी ॥३॥
नामा थोराचे लेकरू | छंद त्याचा अनिवारु ॥४॥
छंद नाम्याचा पुरविण्या | देव वेंची प्रेमनाण्या ॥५॥
हाटी उदमी भाविक | विठुराजा त्या ग्राहिक ॥६॥
