संत भलते याती असो ।
1700.
संत भलते याती असो । परी विठ्ठल मनी वसो ॥१॥
तया घालीन लोळणीं । घेईन मी पायवणी ॥२॥
ज्ञाती कुळासी संबंध । मज नाही भेदाभेद ॥३॥
भलते ज्ञातीचा । विठ्ठल उच्चारी वाचा ॥४॥
तेथे पावन देह चारी । एका जनार्दनी निर्धारी ॥५॥