संतसमागमें सुखाची ते
1725.
संतसमागमें सुखाची ते राशी । म्हणोनि पायांपाशी सलगी केली ॥१॥
वंदू चरणरज घालूं लोटांगण । अभय ते दान संत देती ॥२॥
पंचमहापातकी विश्वास घातकी । ऐशींयासी निकी संतसेवा ॥३॥
एक जनार्दनी संतांचा मी दास । अनन्य पायांस न विसंबे ॥४॥
