वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 3. संत तुकाराम › 1. संत तुकाराम सार्थ गाथा › २. सार्थ अभंग गाथा › ४. सार्थ अभंग १५०१ ते २०००

चला पंढरीसी जाऊ । रख

🙏 3. संत तुकाराम · ABH-080149 · अभंग क्र. १७२४

1724.
चला पंढरीसी जाऊ । रखुमादेवीवरा पाहू ॥१॥
डोळे निवतील कान । मना तेथे समाधान ॥धृपद॥
संता महंता होतील भेटी । आनंदे नाचो वाळवंटी ॥२॥
ते तीर्थांचे माहेर । सर्वसुखाचे भांडार ॥३॥
जन्म नाही रे आणीक । तुका म्हणे माझी भाक ॥४॥

अर्थ :
हे जनहो चला आपण पंढरीस जावू आणि रुक्मादेवीचा वर पाडूरंग याला पाहू या. त्याच्या दर्शनाने डोळे आणि कथा श्रवणाने कान तृप्त होतील आणि तेथे मनालाही समाधान मिळेल. तेथे गेल्यानंतर आपल्याला संत महंत याची भेट होईल व आनंदाने आपण वाळवंटात नाचू. पंढरपूर म्हणजे सर्व श्रेत्रांचे माहेर तसेच सर्व सुखाचे भांडार आहे. तुकाराम महाराज म्हणतात, “अरे जो कोणी तेथे जातो त्याला पुन: जन्ममरण नाही हे मी प्रतिज्ञेने सांगतो. ”

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग