बाहेरी भीतरी तुजचि म
1707.
बाहेरी भीतरी तुजचि मी देखे | चित्त तेणे सुखे वेडावले ॥१॥
संतसंगे मज पालट हा जाला | पाहाता विठ्ठला रूप तुझे ॥२॥
मीपणासहित आनंदी बुडाले | न निघे कांही केले चित्त माझे ॥३॥
नामा म्हणे एक उरलीसे वासना | स्वामिसेवकपणा देई देवा ॥४॥
