प्रपंची जरी माते करि
1731.
प्रपंची जरी माते करिसी उदासीन | तरी तुझे ध्यान लागो मना ॥१॥
हेंचि तुज मागणे जन्मजन्मांतरी | न मागता अंतरो प्रगट होसी ॥२॥
इंद्रियांचे व्यापार अवघेचि तोडी | प्रेमरसगोडी देई माते ॥३॥
नामा म्हणे शरण आलो मी केशना | हावि तू पुरवावा मनोरथ ॥४॥
