वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 4. संत नामदेव › 1. संत नामदेव अभंग गाथा › ३. संत नामदेव गाथा :- भाग ३ › 193. मागणे

मने ध्यान करणे वाचे

🙏 4. संत नामदेव · ABH-082562 · अभंग क्र. १७१०

1710.
मने ध्यान करणे वाचे उच्चारणे | नयनी तुज पाहणे हेंचि देई ॥१॥
माथा चरणी ठेवणे करे पूजा करणे | श्रवणी ऐके गुण हेंचि देई ॥२॥
पञ्चक्रमार्गावरी वावन्न अक्षरी | निरालब निरंतरी भेटी देई ॥३॥
मनसा वाचा कर्म आणि दश इंद्रिये | तुझ्या चरणी होय ऐसे करी ॥४॥
डावी उजवीकडे आणि मागे पुढे | अंतरी चरण जोडे ऐसे करी ॥५॥
नामा म्हणे केशवा मी तुझे लडिवाळ | जन्मोजन्मी जोड हेंचि देई ॥६॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग