वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 4. संत नामदेव › 1. संत नामदेव अभंग गाथा › ३. संत नामदेव गाथा :- भाग ३ › 191. सख्य

तुझे गुणनाम ऐकता श्र

🙏 4. संत नामदेव · ABH-082907 · अभंग क्र. १६९९

1699.
तुझे गुणनाम ऐकता श्रवण नाराध्ये | अवलोकन करित नयन नाराध्ये |
पूजन करिता कर नाराध्यै | ऐसी नाराणुक द्यावी कमळापती ॥ धृ ॥
नरहरि या नामे उदंड | केव्हांही नसावे रिकामे तोंड |
खांदी सतत करंडा वाहे | मस्तकी अखंड निर्माल्य राहे |
नेत्री आनंदजळ वाहे | यामध्ये देवा झणे कांही उणे होय ॥१॥
तुझेनि प्रसादे जठर पोसिले | चरणोदके तृष्णाहरण केले |
नामे नृत्य करिता मन है निवाले | दंडवत घालिता श्रम हरले ॥२॥
गत शयनी विसर न द्यावा श्रीरामा | यापरी निश्चित परमात्मा |
तू आलिया निवारिसी श्रमा| ऐसे केशिराजा विनवितो नामा ॥३॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग