वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 4. संत नामदेव › 1. संत नामदेव अभंग गाथा › ३. संत नामदेव गाथा :- भाग ३ › 193. मागणे

विटेवरी नीट उभा कटी

🙏 4. संत नामदेव · ABH-082575 · अभंग क्र. १७०६

1706.
विटेवरी नीट उभा कटी ठेवुनी कर | तो पुंडलिकाचे द्वारी देखियेला ॥१॥
बहुली बहुली देहुडा पाउली | गुंजाहार गळा देखियेला ॥२॥
पुष्पवतीच्या संगमी गोपाळ आश्रमी | काला करिता आम्ही देखियेला ॥३॥
वेणु वाहता चहुंकरी नाद उठला अंबरी | वासुरे तटस्थ हुंबरी होऊनि देखियेला ॥४॥
अंगी चंदनाची उटी मयुरपत्रांची दाटी | चेंडू खेळता यमुनेतटी देखियेला ॥५॥
नामा म्हणे केशवा देखियेले हृदयी | जन्मवरी राही हेंचि मागे ॥६॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग