सुखे न मनी अवगुण । द
1705.
सुखे न मनी अवगुण । दुःख भोगी त्याचे कोण ॥१॥
हे का ठायीचे न कळे । राती करा झांकुनि डोळे ॥धृपद॥
चालोनि आड वाटे । पायी मोडविले काटे ॥२॥
तुका म्हणे कोणा । बोल ठेवितो शाहाणा ॥३॥
अर्थ :
अहो एखाद्याला स्वतःचे अवगुण समजतच नाहीत मग त्या अवगुणा पासून होणारे दुःख कोणाला भोगावे लागेलअर्थातच त्याचे त्यालाच भोगावे लागेल. हे तुम्हाला माहीत नाही की काय, मग उगाचच डोळे झाकून तुम्ही रात्र का करता ? विनाकारण आडवाटेने जर गेले तर त्याने काय होईल तर जो आडवाटेने जाईल त्याच्याच पायात काटे मोडतील. तुकाराम महाराज म्हणतात शहाणा मनुष्य आपल्या अवगुणामुळे होणाऱ्या दुखाःला इतर कोणालाही दोषी ठरवतो काय ?
