बाहेरी भीतरी पाहता द
1723.
बाहेरी भीतरी पाहता दिसे एकु | उभा असे व्यापकु पंढरिरावो ॥१॥
पंढरीचा राणा विटेवरी जाणा | जीविचिया खुणा भक्ता सांगे ॥२॥
गुंतलो संसारी भरलो कर्मभांडारी विषयामाशारी मोहियेले ॥३॥
नामा म्हणे केशवा माझे उणे न पाही | चरणसेवा देई जन्मोजन्मी ॥४॥
