वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 3. संत तुकाराम › 1. संत तुकाराम सार्थ गाथा › २. सार्थ अभंग गाथा › ४. सार्थ अभंग १५०१ ते २०००

उत्तम घालावे आमुचिये

🙏 3. संत तुकाराम · ABH-080112 · अभंग क्र. १७२१

1721.
उत्तम घालावे आमुचिये मुखी । निवारावे दुःखी होऊ नेदी ॥१॥
न बैसे न वजे जवळूनि दुरी । मागे पुढे वारी घातपात ॥धृपद॥
नाही शंका असो भलतिये ठायी । मावळले पाही द्वैताद्वैत ॥२॥
तुका म्हणे भार घेतला विठ्ठले । अंतरी भरले बाह्य रूप ॥३॥

अर्थ :
हा पाडूरंग जे उत्तम आहे तेच आमच्या मुखामध्ये घालतो ते म्हणजे हरीनाम आणि आम्हाला कधीही हा पाडूरंग दु:खी होऊ देत नाही आमचे सर्व दु:ख निवारण करतो. हा पाडूरंग कधी बसत नाही व कधीही आमच्याजवळून दूर जात नाही केवळ आमच्यासाठी व आमच्यावर मागेपुढे होणाऱ्या घातपाताचे निवारणही हा करतो. आता आम्हाला कसल्याही प्रकारचे भय राहीले नाही कारण आमच्या मनातील द्वैत अद्वैत मावळले आहे. तुकाराम महाराज म्हणतात, “या पाडूरंगानेच आमच्या योगक्षेमाचा भार घेतला आहे व त्याचेच रुप आमच्या अंतरंगात व बाह्यरंगात भरले आहे.

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग