वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 4. संत नामदेव › 1. संत नामदेव अभंग गाथा › ३. संत नामदेव गाथा :- भाग ३ › 193. मागणे

आडलिया कोंवसा अनाथा

🙏 4. संत नामदेव · ABH-082574 · अभंग क्र. १७३०

1730.
आडलिया कोंवसा अनाथा कैवारी | ब्रीद चराचरी वर्णिताती ॥१॥
येई वा श्रीहरी तू आमचा कैवारी | सुदर्शन करी येई शीघ्र ॥२॥
गजेंद्राकारणे कळवळा अगाध | जगी तुझे ब्रीद तैसा येई ॥३॥
सुदामा ब्राह्मण अनाथ दुर्बळ | तेथे तू केवळ अवतरलासी ॥४॥
ध्रुवासी स्थापिले उपमन्याकारणे | क्षीरसागर देणे तैसा येई ॥५॥
अंबऋषीसाठी सोशी गर्भवास | दुर्वासा कासावीस तैसा येई ॥६॥
विदुरासी भक्तपण तू उद्धवासी जवळी | अर्जुना सर्वकाळी तैसा येई ॥७॥
गोपाळा यशोदा नंदासी खेळसी | गायी रानी चारिसी तैसा येई ॥८॥
नामा म्हणे मागेन सदा अभयकर | प्रेमाचा उदार तसा येई ॥९॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग