कृपाळ उदार तुम्ही सं
1731.
कृपाळ उदार तुम्ही संत । दीन अनाथ तारिले ॥१॥
हाचि महिमा ऐकिला । जीव गुंतला चरणी ॥२॥
करा माझे समाधान । देउनी वचन अभयांचें ॥३॥
यावई फार बोलु नेणे । उचित करणे तुम्हासी ॥४॥
एका जनार्दने शरण । आहे मी दीन पामर ॥५॥