केशवचरणी मने दिली बु
1703.
केशवचरणी मने दिली बुडी इंद्रिये बापुडी धांवती पाठी ॥१॥
संसार संभ्रम नको सुखलेश | भातुके सरिसे पाठविसी ॥२॥
जन्मजन्मांतरी जाणावे कवणे | नेणोनि भोगणे कवणे स्वामी ॥३॥
नामा म्हणे केशवे भक्तवत्सले | आम्हांसि वेगळे होऊ नका ॥४॥
