वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 4. संत नामदेव › 1. संत नामदेव अभंग गाथा › ३. संत नामदेव गाथा :- भाग ३ › 193. मागणे

साधुनि समाधी तुज म्य

🙏 4. संत नामदेव · ABH-082594 · अभंग क्र. १७२९

1729.
साधुनि समाधी तुज म्या चितावे | मग माझ्या याये हृदयति ॥१॥
तंव पांडुरंगा संतामाजी उणे | तुजलागी निर्वाण करी देवा ॥२॥
तुजसी संबंध लौकिका वेगळा | पाळिसी गोपाळा लळे माझे ॥३॥
उपजता बाळ हितार्थी लागोनी | प्रसन्न जननी होई आधी ॥४॥
भिडेस्तव पान्हा फुटोनिया थानी | पेहे त्या पाजुनि दिले काय ॥५॥
उदित सूर्यास लागे विनवावा यावे तुवा गांवा प्रकाशित ॥६॥
मग ते तयाने निवारावे तमा | हे तो मेघः श्यामा नाही श्रुत ॥७॥
पृथ्वी भूती काय करावा आदरू | मग त्याचा भारू चालवावा ॥८॥
जीवना जीवन प्रार्थनि आणावे | तेणे काय निववावे संत त्यांसी ॥९॥
सर्वज्ञ उदार होसी चक्रवर्ती | कार्याकारणांती नांद तुझी ॥१०॥
नामा म्हणे माझे चित्त कृष्णाकार | करूनि निर्धार प्रेम देई ॥११॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग