संतसुखसागरीं । बुडी
1727.
संतसुखसागरीं । बुडी दिधली निर्धारी । भव दुःख हरी । संतनामें ॥१॥
ऐसा संताचा महिमा । नाही द्यावय उपमा । ब्रह्मासुखधामा । पुढे नाचे ॥२॥
बोलती ते वचन साचे । नाही बोलणें असत्याचे । नामी प्रेम जायाचें । जडोनि ठेले ॥३॥
कृपावंत संत । दीन तारिले त्वरित । एका जनार्दनी मात । श्रवण मज झालीं ॥४॥
