वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 4. संत नामदेव › 1. संत नामदेव अभंग गाथा › १. संत नामदेव गाथा :- भाग १ › 135. श्री विठ्ठल महात्म्य

माता पिता बंधु भगिनी

🙏 4. संत नामदेव · ABH-083147 · अभंग क्र. ३६१

361.
माता पिता बंधु भगिनी इष्टमित्र विठ्ठला तू रे ॥ध्रु.॥
बापा यावे भेटावे विसावा माझा गा तू |माझा कुळाचार माहेर रे जिव्हार विठ्ठला तू ॥१॥
माझे विद्याधन आयुष्य आरोग्यता विठ्ठला तू गा |माझे तप व्रत तीर्थ दान पुण्य विठोबा तू गा ॥२॥
माझा गुरूमंत्र दैवत आगम निगम विठ्ठला तू गा | भूपति सुरपति ब्रह्ममूर्ति विठोबा तू गा ॥३॥
माझा आचार विचार सत्यवादी धीर धर्म विठोबा तू गा |यश कीर्ती निव्रुत्ति आता माझी त्रुप्ति विठोबा तू गा ॥४॥
माझे यम नियम प्राणायामप्रत्याहार विठ्ठला तू गा |नामा म्हणे विठोबा केशव परमात्मा माझा तू गा ॥५॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग