वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 2. संत ज्ञानेश्वर › 1. संत ज्ञानेश्वर सार्थ अभंग गाथा › 1. उपासना कांड › ११, योग अभंग ३४२ ते ४४४

औट पीठ डोंगरी गाय एक

🙏 2. संत ज्ञानेश्वर · ABH-075125 · अभंग क्र. ३५९

359.
औट पीठ डोंगरी गाय एक वसे ।
क्षीर सेवितुसे निजयोगी ॥१॥
धाले पर्वपदी समान लक्षिती ।
क्षुधा चाड चित्ती नाही नाही ॥२॥
भ्रुवातंरी लक्ष लाऊनी बैसा ध्यानी ।
ऐक्यासी उन्मनी होऊनी राहा ॥३॥
ज्ञानदेव नमितो आदी देवी प्रती ।
नेत्री पाहे ज्योति शुद्धरूप ॥४॥

अर्थ :
योग्याभ्यासातील अग्नीचक्ररूप डोंगर त्यावर चित्तरूप गाय बसते. व गायीचे स्थिरतारूप दूध योगी सेवन करतो. त्या दूधाने तृप्त झाल्यामुळे भुक लागत नाही. दोन्ही भुवयांच्या मध्ये असलेल्या अग्नीचक्राचे ठिकाणी चित्त ठेऊन ध्येयरूप झाल्यामुळे सहजच उन्मनी दशा प्राप्त होते. आदि देवता जे ब्रह्म स्वरूप त्यास मी वंदन करतो व तीच शुध्द ज्योती डोळ्यात दिसते. असे माऊली ज्ञानदेव सांगतात.

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग