उत्तम ते क्षेत्र उत्
363.
उत्तम ते क्षेत्र उत्तम ते स्थळ । धन्य ते राऊळ पाहता डोळा ॥१॥
एक एक तीर्थ घडती कॊटी वेळां । चंद्रभागा डोळा देखिलिया ॥२॥
गंगा प्रदक्षिणा समुद्राचे स्नान । परी हे महिमान नाही कोठे ॥३॥
वैष्णवांचा मेळ करिती गदारोळ । दिंडी पताका घोळ नोहे कोठे ॥४॥
एका जनार्दानी सारांचे हे सार । पंढरी मोहरे भाविकांसी ॥५॥
