समुद्रवलयांकित पृथ्व
362.
समुद्रवलयांकित पृथ्वी पाहता । ऐसे तीर्थ सर्वथा नाही कोठे ॥१॥
भाविकांचें माहेर जाणा पंढरपुर । विठ्ठल विटेवर उभा असे ॥२॥
एका जनार्दनी तयाचाचि ठसा । भरुनि आकाशा उरलासे ॥३॥