वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 4. संत नामदेव › 1. संत नामदेव अभंग गाथा › १. संत नामदेव गाथा :- भाग १ › 135. श्री विठ्ठल महात्म्य

बरवेपण बरवा बाप मदना

🙏 4. संत नामदेव · ABH-083118 · अभंग क्र. ३६२

362.
बरवेपण बरवा बाप मदनाचा |तो स्वामि आमुचा पंढरिराव ॥१॥
उदारपणे उदार दाता त्रैलोक्याचा |तो स्वामि आमुचा पंढरिराव ॥२॥
झुंजार आणि शूर अरी त्या दैत्यांचा |तो स्वामि आमुचा पंढरिराव ॥३॥
चतुरपणे चतुर बाप ब्रह्मयाचा |तो स्वामि आमुचा पंढरिराव ॥४॥
पवित्रपणे पवित्र उध्दार तीर्थांचा |तो स्वामि आमुचा पंढरिराव ॥५॥
नामा म्हणे आधार सकळा जीवांचा |तो स्वामि आमुचा पंढरिराव ॥६॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग