वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 2. संत ज्ञानेश्वर › 1. संत ज्ञानेश्वर सार्थ अभंग गाथा › 1. उपासना कांड › ११, योग अभंग ३४२ ते ४४४

एका एक गुज बोलतो निर

🙏 2. संत ज्ञानेश्वर · ABH-075078 · अभंग क्र. ३६९

369.
एका एक गुज बोलतो निर्वाण ।
निवृत्तीचरण आठउनी ॥१॥
अर्धमात्राक्षरी अक्षरे पाहाती ।
अनाक्षरा परती बाईयांनी ॥२॥
रज तम सत्त्व याहुनी निराळी ।
लक्षाही वेगळी निवृत्ति जाणे ॥३॥
ध्येय ध्याता ध्यान परता जिचा खेळ ।
ज्ञेय ज्ञाता ज्ञान याची साक्ष ॥४॥
सत् चित् आनंद ब्रह्मा हरि हर ।
तेही जिचा पार नेणविती ॥५॥
सलोकता मुक्ती आदी तिन्ही वर ।
वसते जे घर योगियांचे ॥६॥
त्वंपद तत्पद असिपदाचा रंग ।
त्याचा अंतरंग देखा बाईयांनो ॥७॥
निवृत्ति सोपान मुक्ताबाईची खूण ।
ज्ञानदेव सघन बोलिली हे ॥८॥

अर्थ :
माऊली म्हणतात मी श्रीगुरू निवृत्तिनाथांच्या चरणाचे स्मरण करून सर्वांना मोक्षप्राप्तीचे गुह्य ज्ञान सांगतो. अर्धमात्रा असे जिला म्हणतात तेच मोक्षरूप ब्रह्माचे स्वरूप होय ते शब्दाने वाच्य होण्यासारखे नसल्यामुळे तेचे अक्षरांचा लाग नाही. पण अनाक्षराच्या ही पलीकडे ते आहे. ते ब्रह्म सत्त्व रज तमरूप जी माया तिच्या पलीकडचे आहे ते कोणालाही विषय होत नाही. त्याचे ठिकाणी ध्याता ध्येय व ध्यान तसेच ज्ञाता, ज्ञेय व ज्ञान इत्यादि त्रिपुटोची लाग लागत नाही. त्याचा केवळ साक्षी आहे हे शब्दातीत ब्रह्मस्वरूप, ब्रह्मदेव शंकर विष्णु यांनाही कळले नाही याचा अर्थ ब्रह्मा, विष्णु, महेश अज्ञानी होते असा नसून म्हणजे ब्रह्म हे त्याचे स्वरूपच असल्यामुळे निराळे विषयरूपाने त्यांना कळते नाही. सलोकता, समीपता व स्वरूपता इत्यादि तिन्ही मुक्तिच्याही वर जे योग्यांचे केवळ घरच आहे. जे तत् त्वम् व असि या पदांच्या लक्ष्याने कळते. तेच निवृत्तीनाथ, सोपानदेव व मुक्ताबाई यांना कळले व त्यांच्याच कृपेने मी त्याच्या अनुवाद केला असे माऊली सांगतात.

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग