वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 6. संत निळोबाराय › 1. संत निळोबाराय अभंग गाथा › २. संत निळोबा गाथा भाग २ › ९. पंढरीमहात्म्य व पांडुरंगाचे वर्णन

अचळ धरा तैसे पीठ ।

🙏 6. संत निळोबाराय · ABH-088373 · अभंग क्र. ३७२

372.
अचळ धरा तैसे पीठ ।
पायातळी मिरवे वीट ॥१॥
दोन्ही पाउले समान ।
जैसे योगीयाचे नयन ॥२॥
जानु जंघ ते स्वयंभ ।
जैसे कर्दळीचे स्तंभ ॥३॥
कसीयले पीतवसन ।
झळके विधुल्लते समान ॥४॥
शेष बैसला वेटाळा ।
तैसा कटिबंध मेखळा ॥५॥
समुद्र खोलीये विशाळ ।
तैसे नाभीचे मंडळ ॥६॥
तुळसी मंजरिया गळा ।
जैशा सुटल्या मेघमाळा ॥७॥
दिग्गजाचे शुंडादंड ।
तैसे कटी कर प्रचंड ॥८॥
पूर्णिमेचा उदो केला ।
तैसा मुखचंद्र शोभला ॥९॥
जैसी नक्षत्रे झमकती ।
तैसी कुंडले चमकती ॥१०॥
सूर्य मिरवे नभमंडळा ।
तैसा केशराचा टिळा ॥११॥
क्षीराब्धीचे चंचळ मीन ।
तैसे नेत्री अवलोकन ॥१२॥
जैसे मेरुचे शिखर ।
तैसा माथा मुगुट स्थिर ॥१३॥
इ्ंदु प्रकाशे वेढिला ।
तैसा क्षीरोदके वेष्टिला ॥१४॥
तृप्तीलागी चातकपक्षी ।
निळा तैसा ध्यान लक्षी ॥१५॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग