आवडे जे जीवा ते पंढर
366.
आवडे जे जीवा ते पंढरीये उभे |पुंडलिके लोभे राहविले ॥१॥
जोडुनि पाऊले ठेवियली विट |करद्वय गोमटे कटावरी ॥२॥
कान मुख डोळे न म्हणती पुरे |सेविता न पुरे धणी मना ॥३॥
गोड लागे पोट न भरे न धाये |भूकेलीच राहे भूक सदा ॥४॥
नामा म्हणे संत-संगती विश्वास |घेऊ अनुभवास फार फार ॥५॥
