वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 2. संत ज्ञानेश्वर › 1. संत ज्ञानेश्वर सार्थ अभंग गाथा › 1. उपासना कांड › ११, योग अभंग ३४२ ते ४४४

गगनमंडळी नारी सुकुमा

🙏 2. संत ज्ञानेश्वर · ABH-075101 · अभंग क्र. ३७२

372.
गगनमंडळी नारी सुकुमार दिसे ।
तिन्ही लोक वसे तिचे उदरी ॥१॥
परादी वाचा तन्मय ते झाली ।
साक्षीत्वासी आली ब्रह्मरंध्री ॥२॥
ज्ञानदेव म्हणे नयनांतील ज्योती ।
पाहता वृत्ति हरे विषयांची ॥३॥

अर्थ :
ब्रह्मरंधातील चिदाकाशामध्ये सुकुमार असणारी जी तुर्यावस्थारूप नारी तिच्या उदरांत तिन्ही लोक सामावलेले आहेत. परा, पश्यति, मध्यमा व वैखरी या चारी वाणी तद्रूप झाल्यामुळे काही वर्णन करू शकत नाहीत पण ब्रह्मरंधात ती साक्षी म्हणून असते. अशा त हेची ब्रह्मस्वरूप ज्योत अनुभवाला आली. म्हणजे विषया कडील धांव आपोआपच थांबते. असे माऊली ज्ञानदेव सांगतात.

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग