पहा त्रिभुवनी न दिसे
362.
पहा त्रिभुवनी न दिसे बाईये ।
नयनांजनी पाहे आत्मरुप ॥१॥
मन बुद्धि चित्त अंतःकरण जाण ।
या वेगळे निर्वाण ब्रह्म तेचि ॥२॥
ज्ञानदेवा ब्रह्म लाधले अवचट ।
उन्मनीचा घाट चढतांची ॥३॥
अर्थ :
परमात्मा त्रैलोक्यात भरला असून ही स्थूल दृष्टीने पाहाणाऱ्याला तो दिसत नाही पण त्याच डोळ्यांत जर ज्ञानरूपी अंजन घातले तर तो आत्मरूपाने दिसतो. मन बुद्धी, चित्त, अंतःकरण याहून वेगळा मोक्षरूप असा तो परमात्माच आहे. योगाभ्यास करून उन्मनी अवस्थेचा घाट ओलांडल्यानंतर मला ते ब्रह्म सहज लाभले असे माऊली ज्ञानदेव सांगतात.
