वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 2. संत ज्ञानेश्वर › 1. संत ज्ञानेश्वर सार्थ अभंग गाथा › 1. उपासना कांड › ११, योग अभंग ३४२ ते ४४४

अकारी अर्धमात्रा कवण

🙏 2. संत ज्ञानेश्वर · ABH-075081 · अभंग क्र. ३६५

365.
अकारी अर्धमात्रा कवण रीति दिसे ।
उकारीही रसे कवणे परी ॥१॥
मकारी संयुक्त झाली कैशापरी ।
अर्धमात्रेवरी अर्धमात्रा ॥२॥
अर्धमात्रेचा अर्थ अवचटचि दिसे ।
गुरूगम्य सोय जाणती पै ॥३॥
ज्ञानदेवे अर्थ शोधूनी घेतला ।
महाशून्यी संचला निवृत्तिराज ॥४॥

अर्थ :
अकारी म्हणजे ओंकाराच्या ठिकाणी अर्धमात्रारूप असलेले जे परमतत्त्व ते कोण्यारितीने पाहिले जाईल. उकारांतही ते कोण्यारूपाने आहे. मकारांत ते तत्त्व कसे संयुक्त झाले आहे. अर्धमात्रास्वरूप असलेल्या तत्त्वाच्या ठिकाणी अर्धमात्रा म्हणणेपणा जो आलेला आहे. या प्रश्नाचे उत्तर एकचक्री अर्धमात्रेचा अर्थ म्हणजे विषय, गुरूकृपा होईल तर सहजच दिसेल. महाशून्याच्या स्थानी परमात्मा आहे. हे श्रीगुरू निवृत्तिरायांच्या कृपेने मी शोधून पाहिले. असे माऊली ज्ञानदेव सांगतात.

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग