हरि उच्चारणी अनंत पा
361.
हरि उच्चारणी अनंत पापराशी ।
जातील लयासी क्षणमात्रे ॥१॥
तृण अग्निमेळे समरस झाले ।
तैसे नामे केले जपता हरि ॥२॥
हरि उच्चारण मंत्र हा अगाध ।
फळे भूतबाधा भेणे तेथे ॥३॥
ज्ञानदेव म्हणे हरि माझा समर्थ ।
न करवे अर्थ उपनिषदा ॥४॥
हरि मुखे म्हणा हरि मुखे म्हणा ।
पुण्याची गणना कोण करी ॥धृपद॥
