वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 2. संत ज्ञानेश्वर › 1. संत ज्ञानेश्वर सार्थ अभंग गाथा › 1. उपासना कांड › ११, योग अभंग ३४२ ते ४४४

शून्य हे चार महाशून्

🙏 2. संत ज्ञानेश्वर · ABH-075075 · अभंग क्र. ३६६

366.
शून्य हे चार महाशून्य दिसतसे ।
निजरंग वसे सर्व त्यात ॥१॥
ऐसा रंग जया लाधतांचि पाही ।
मनाची ही सोई हारपली ॥२॥
ज्ञानदेवाचा बोल बोलण्यांचे रूप ।
निवृत्तिस्वरूप सर्वत्र हे ॥३॥

अर्थ :
योगाभ्यासी पुरूष ज्या तेजोमय नील बिंदुकडे पाहतात ते शून्य चार भागांत विभागलेले असून त्यातील सर्वांच्या आतील भाग तो महाशून्यच होय. व त्यातच ब्रह्मतत्त्व साठवलेले आहे. अशी ज्याची दष्टी झाली. त्याच्या मनाचा मनपणा नाहिसा होतो. आमचे बोलणे शब्दरुप जरी दिसले तरी ते सर्व निवृत्तीस्वरुपच आहे असे माऊली ज्ञानदेव सांगतात.

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग